नायगाव सिटी न्यूज
search

बी. रघुनाथ पुरस्कार व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' कादंबरीला जाहिर

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बी. रघुनाथ पुरस्कार व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' कादंबरीला जाहिर

ज्येष्ठ मराठी साहित्यीक बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार नायगाव तालुक्यातील बरबडा येथील प्राध्यापक व्यंकटेश सोळंके लिखित अरसूड या त्यांच्या कादंबरीला जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरांत बी. रघुनाथ स्मृती सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. परभणी येथे बी. रघुनाथ महोत्सव घेतल्या जातो.या वर्षीच्या बी. रघुनाथ पुरस्कारासाठी व्यंकटेश सोळंके यांच्या 'अरसड' या कादंबरीची निवड करण्यात आली.

ही कादंबरी लोकवाङ्मय गृह मुंबई यांनी प्रकाशीत केली आहे.मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखनाने स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ या अत्यंत चर्चित कादंबरीची यंदाच्या प्रतिष्ठित ‘बी. रघुनाथ पुरस्कारासाठी ' निवड झाली आहे.


विशेष आनंदाची बाब म्हणजे, सोळंके यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील हा पहिलाच साहित्यकृती पुरस्कार आहे. त्यांच्या ‘अरसड’ कादंबरीला मिळालेला हा सन्मान त्यांच्या संवेदनशील लेखनशैलीचा, सामाजिक जाणिवेचा आणि साहित्यिक

व्यंकटेश सोळंके जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, बरबडा, ता. नायगांव, जि. नांदेड येथे प्राध्यापक आहेत. विविध नियतकालीके, मासिके यातुन नियमीत लिखाण करणारे सोळंके यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे. अक्षरायण समीक्षा सदर व शेतीचे अर्थकारण ह्या लेखमाला लिहिलेल्या आहेत.


बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचे आयोजन परभणीकर मित्र मंडळ व साहित्य संगीत कला मंचच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. यापुर्वी हा पुरस्कार श्रीकांत सराफ यांच्या 'तितर बितर' या कादंबरीस, इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहास, प्रसाद कुमठेकर यांच्या 'इत्तर गोष्टी' या कथा संग्रहास देण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.पुरस्कार निवड समितीच्यावतीने संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT