: चढ-उतार, चारही दिशांना जोडणारा चौरस्ता आणि वाहनांचा वाढता वेग यामुळे हा परिसर धोकादायक बनला असून, येथे तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिगंबरराव पाटील गायकवाड यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
मांजरम बसस्टॉप परिसरातून चारही दिशांना वाहतूक होत असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. पूर्व दिशेला नायगावकडे जाणारा रस्ता असून याच मार्गावर कन्या शाळा आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. त्यातच रविवारी या परिसरात आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होते.
पश्चिम दिशेला संपूर्ण मांजरम गाव असून गावातील दैनंदिन दळणवळण याच मार्गावरून चालते. दक्षिणेकडील रस्ता गडग्याकडे जाणारा चढाचा असून पुढे मुखेड तालुक्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. तर उत्तरेकडील मार्ग नांदेडकडे जात असून या दिशेला इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या मार्गावरील उतारामुळे वाहनांचा वेग आणखी वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
बसस्टॉप परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आठवडी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, तसेच आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अपघातानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन मांजरम बसस्टॉप परिसरात गतिरोधक बसवावेत, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिगंबरराव पाटील गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
