नायगाव सिटी न्यूज
search

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
“

नायगाव / भगवान शेवाळे

शिक्षणाच्या क्षेत्रात पंचक्रोशीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बरबडा गावच्या शैक्षणिक यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बरबडा येथील तब्बल १३ जणांची जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झाली असून, विशेष म्हणजे हे सर्व जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.यांच्या या यशामुळे गावाच्या शैक्षणिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या या १३ जणांची विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झाली आहे. यामध्ये अमोल विठ्ठलकर – यवतमाळ, करण रणखांबे – पालघर, पूजा संजय मंगनाळे – संभाजीनगर, सूर्यकांत जेठेवाड – सोलापूर, राधा बळीराम धुमाळे – गडचिरोली, कैलास दशरथ मदेवाड – नाशिक, राऊ दशरथ मदेवाड – बुलढाणा, माधव सुरणे – वर्धा, कृष्णा पाम्पटवार – यवतमाळ, विद्या नारायण अक्कलवाड, दिपाली शिवाजी पटवे – यवतमाळ, पल्लवी विकास बल्फेवाड – चंद्रपूर आणि फेयाज बेग – कोल्हापूर यांचा समावेश आहे.


शिक्षक भरतीपुरतेच नव्हे,शासकीय सेवेतही बरबड्याचा ठसा


बरबडा गावाची ओळख केवळ शिक्षकांचे गाव म्हणून मर्यादित नसून, विविध शासकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. गावातील अनेक माजी विद्यार्थी डॉक्टर, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई तसेच महसूल, कृषी आणि इतर विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत आहेत.त्यामुळे नायगाव तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असलेले गाव म्हणुन बरबडा गावची ओळख निर्माण झाली असून, पिढ्यान् पिढ्या शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याची ही परंपरा आजही कायम असल्याचे या यशातून दिसून येते.


माजी विद्यार्थ्यांचे यश म्हणजे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश


एका गावातील एकाच शाळेचे तब्बल १३ माजी विद्यार्थी एकाच भरती प्रक्रियेत शिक्षक म्हणून पात्र ठरणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. मात्र या यशाकडे केवळ अभिनंदन म्हणून न पाहता,गावातील सध्याच्या विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.आजच्या काळात स्पर्धा मोठी आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नसून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि संयम आवश्यक आहे. त्यामुळे तरुणांनी फुजूल वेळ वाया न घालवता आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेतली, तर परिस्थिती कोणतीही असो, यश मिळवणे शक्य आहे.हा संदेश बरबड्याच्या या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांसमोर याच गावातील अनेक यशस्वी व्यक्तींचे उदाहरण आहे. गावातून शिकलेले विद्यार्थी देखील विविध उच्च पदांवर पोहोचू शकतात, हे आता यातून सिद्ध झाले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी रिकामटेकडेपणात वेळ घालवण्याऐवजी शिक्षणाला प्राधान्य देत ध्येय निश्चित करावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि सातत्याने कष्ट करावेत.एखाद्या विद्यार्थ्याचे यश केवळ त्याचे स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलण्याची ताकद त्यात असते.दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथून शिक्षण घेतलेल्या या १३ माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकपदाच्या माध्यमातून समाजाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
शैक्षणिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

ANCHOR AD SLOT