नायगाव सिटी न्यूज
search

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
“

नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, खड्डे चुकविताना वाहनांचा तोल जाण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या खड्ड्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून,एखाद्याचा बळी गेल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.


डिव्हायडरवर झाडे नसल्याने वाहनचालकांना हेडलाईटचा त्रास..


महामार्गावरील डिव्हायडरवर पुरेशी झाडे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र हेडलाईटचा प्रकाश थेट चालकांच्या डोळ्यांवर पडत आहे. त्यामुळे काही क्षणांसाठी रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने डिव्हायडरवर योग्य झाडे किंवा हिरवळ लावून वाहनचालकांना होणारा हा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.


टोलवसुली होते, मग रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी कोणाची?


संबंधित महामार्गावर टोलवसुली सुरू असताना रस्त्याची नियमित देखभाल, दुरुस्ती, खड्डे बुजविणे, रस्ते सुरक्षा उपाययोजना तसेच आवश्यक त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांची नाही का..?? असाही सवाल वाहनधारकाकडून उपस्थित केला जात आहे.


खड्डे केंव्हा बुजवणार..?


नांदेड–हैदराबाद मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असताना रस्त्याची अशी खड्डेमय अवस्था राहणे ही चिंतेची बाब आहे. संबंधित विभागाने करारानुसार संबंधित कात्राटदाराला खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
शैक्षणिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

ANCHOR AD SLOT