नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील वजीरगावकर आणि महानगराध्यक्ष मोहम्मद नुसरत यांच्या पुढाकारातून मंगळवार, दि. २७ रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, इंदिरा भवन, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय सरदार पटेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासरावजी अवताडे (बापू), नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांच्या हस्ते महारक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव अवताडे यांनी काँग्रेस सेवा दलाचा इतिहास, विचारधारा, आचार, त्याग, समर्पण आणि बलिदान यांविषयी सविस्तर विवेचन केले. आगामी काळात कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, उपासमार आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या मदतीसाठी तत्पर राहावे. संकटग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत पोहोचवून समाजोपयोगी कार्य प्रभावीपणे पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीही काँग्रेस सेवा दलाने संकटकाळात सामाजिक उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदतीचा हात द्यावा, असे सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही अडचणीच्या काळात मदतीची गरज भासल्यास नांदेड जिल्हा काँग्रेस आणि खासदार म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गणेश पाटील वजीरगावकर यांच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक
काँग्रेस सेवा दलातील सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष असा प्रवास करणारे गणेश पाटील वजीरगावकर यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद यांसह बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला महानगराध्यक्ष अब्दुल गफार, महाराष्ट्र प्रदेशच्या डॉ. रेखाताई चव्हाण, सुरेशदादा गायकवाड, सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, राजेश पावडे, कुमार कुर्तुडीकर, रामदास पाटील सोमठाणकर, डॉ. भगवानराव मनूरकर, ललिताताई कुंभार, गोविंद बाबा गौड, सूरज पाटील शिंदे, गोविंद पाटील, महेश देशमुख तरोडेकर, प्रतापराव देशमुख, संदीप देशमुख बारडकर, राजू पाटील बोळशेकर, रोहन धनंजकर, दादाराव पाटील नागेलीकर, बाळासाहेब देशमुख आंबेगावकर, गगन यादव, ज्योती कदम आणि संजय वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवा दलाचे पदाधिकारी अरविंद पाटील शिरसागर, गोविंदराव माली पाटील, माधवराव दुगाळे, सुदर्शन पाटील खंडेजोड, अक्षय काकडे, विलासराव ढगे, कालिदास कोरके, मुरलीधर मस्कले सर, परमेश्वर खोसे, खंडेराव शेंडगे, श्रीनिवास कदम, शेख फय्युम, लालबा सूर्यवंशी, केशवराव मुधोळ यांच्यासह सेवा दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.