नायगाव सिटी न्यूज
search

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

नायगाव | प्रतिनिधी : भगवान शेवाळे


नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज,दि. २२ रोजी तहसील कार्यालय नायगाव येथे पार पडली. या सोडतीमध्ये बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेसाठी पुन्हा एकदा आरक्षित झाले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि एकूण राजकीय आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक होऊ नये, तसेच इतर मागासवर्गीय (OBC) आणि इतर प्रवर्गां चे समन्यायी व कायदेशीर प्रमाणीकरण करण्यासाठी ग्रामविकास विभागाला आरक्षणाची प्रक्रिया फेरबदल करून पुन्हा राबवावी लागली असून,या नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीत बरबडा येथील सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी निश्चित झाले आहे.विशेष म्हणजे यापूर्वी देखील हे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले होते.


सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नायगाव तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविण्यात आली. याबाबतची अधिकृत सूचना तहसील कार्यालयाकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता या पदासाठी इच्छुक महिला उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
शैक्षणिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

ANCHOR AD SLOT