नायगाव सिटी न्यूज
search

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या उमरी तालुकाध्यक्षपदी रामचंद्र गजेवाड बिनविरोध, तर जिल्हा कार्यकारिणीवर संदीप वरवटकर यांची निवड

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या उमरी तालुकाध्यक्षपदी रामचंद्र गजेवाड बिनविरोध, तर जिल्हा कार्यकारिणीवर संदीप वरवटकर यांची निवड

नायगाव/प्रतिनिधी :


महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या त्रिवार्षिक निवडणूक २०२६ च्या प्रक्रियेत उमरी तालुका स्तरावर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. संघटनेच्या उमरी तालुका अध्यक्षपदी रामचंद्र गजेवाड यांची अत्यंत उत्साहात आणि बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून संदीप वरवटकर यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी व कर्मचाऱ्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ही नवनिर्वाचित कार्यकारिणी अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

तालुका कार्यकारिणीच्या अन्य महत्त्वपूर्ण पदांवरही तज्ज्ञ व अभ्यासू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये कार्याध्यक्षपदी एम. के. कदम, उपाध्यक्षपदी डी. एम. उलगुलवड, सचिवपदी एम. बी. पाटील, खजिनदारपदी जी. आर. शिंदे, प्रसिद्धीप्रमुखपदी व्ही. व्ही. एनलोड, तर तालुका महिला प्रतिनिधी म्हणून के. जी. सोनकांबळे यांची निवड झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली; निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायगावचे रामदास भुताळे व इरफान शेख यांनी जबाबदारी पार पाडली.या विशेष कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मिराशे, मंडळ कृषी अधिकारी गंजेवार व लखमोड, उप कृषी अधिकारी मनुरकर व ज्योती येरावाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहाय्यक कृषी अधिकारी येरावाड, ओमप्रकाश गजेवाड, सतीश नागलवाड, डोपलावार, पामलवाड आणि 'आत्मा' यंत्रणेचे जालावर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उमरी येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT