नायगाव सिटी न्यूज
search

खरीपाचा नुसता पाचोळा हाती लागला...परतीच्या पावसावर आता रब्बीची आशा !!

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

खरीपाचा नुसता पाचोळा हाती लागला...परतीच्या पावसावर आता रब्बीची आशा !!



नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे


यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.पावसाने पाठ फिरवल्याने नायगाव तालुक्यातील बरबडा,पाटोदा,वजीरगाव,अंतरगाव,कृष्णूर,कहाळा,मनूर,इज्जतगांव,सावरखेड,घुंगराळा,हिप्परगा,सोमठाणा,रुई यासह तालुक्यातील अनेक गावात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर यांसह विविध पिकांच्या उत्पादनावर याचा गंभीर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कवडीमोल उत्पन्नही हाती येण्याची शक्यता आता नसल्यागत जमा आहे.परिणामी सोयाबीनचा तर अक्षरशः पाचोळा हाती लागल्याची गत आहे.



या हंगामातून मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा आली असली, तरी आता परतीचा पाऊस जर पुरेसा झाला तर रब्बी हंगामातून काहीसा दिलासा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असल्याने आगामी पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारकडून राज्यातील 265 तालुके दुष्काळ म्हणून घोषित झाले आहेत.यात नायगावचा देखील समावेश आहे. मात्र दुष्काळ जाहीर झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हाती दिवाळीअगोदर तातडीची रोख मदत मिळणार का..? असा प्रश्न निर्माण होत आहे.सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याचा खोडा घातला आहे.हा लवकर पूर्ण करुन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे, खत उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.एकूणच यंदा खरीप हंगामाने शेतकऱ्यांची निराशा केली असून रब्बी हंगामासाठी बरबडा परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.


Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT