नायगाव सिटी न्यूज
search

सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीची लूट थांबवा; बालाजी बच्चेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सोयाबीन खरेदीतील २ किलो कट्टीची लूट थांबवा; बालाजी बच्चेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे


जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रियेत दोन किलो कट्टीच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. सोयाबीन खरेदीसाठी ५० किलो ८०० ग्रॅमची योग्य भरती पद्धत लागू करावी, तसेच संपूर्ण जिल्ह्यात जूट बारदानामध्ये एकसमान पद्धतीने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याऐवजी वजनातील कथित अनियमिततेमुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे बच्चेवार म्हणाले.

सोयाबीन खरेदी करताना बारदान्यासह ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पद्धत लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून,काही व्यापारी व बाजार समित्यांमधील खरेदी प्रक्रियेत ५२ किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन भरून त्यातून दोन किलो कट्टी वजा केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान होत असून, मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे बच्चेवार यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लेखी निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून नियमबाह्य कट्टी आकारली जाणार नाही, याची दक्षता घेऊन निर्धारित वजनपद्धतीनुसारच सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व आडतदारांवर संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, प्रत्येक बाजार समितीत वजनपद्धतीबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

नांदेड जिल्ह्यात ‘एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ परीक्षा; ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!
शैक्षणिक

नांदेड जिल्ह्यात ‘एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट’ परीक्षा; ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!

कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस कुंटूरकर शुगरलाच द्यावा - बालाजी बच्चेवार यांचे आवाहन; महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी
कृषी

कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस कुंटूरकर शुगरलाच द्यावा - बालाजी बच्चेवार यांचे आवाहन; महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या उमरी तालुकाध्यक्षपदी रामचंद्र गजेवाड बिनविरोध, तर जिल्हा कार्यकारिणीवर संदीप वरवटकर यांची निवड
कृषी

महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या उमरी तालुकाध्यक्षपदी रामचंद्र गजेवाड बिनविरोध, तर जिल्हा कार्यकारिणीवर संदीप वरवटकर यांची निवड

दुष्काळाच्या संकटात ‘माहेर’ धावून आलं...! शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आ.राजेश पवार यांचा मदतीचा हात
सामाजिक

दुष्काळाच्या संकटात ‘माहेर’ धावून आलं...! शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आ.राजेश पवार यांचा मदतीचा हात

ANCHOR AD SLOT