नायगाव सिटी न्यूज
search

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून राजीव गांधी विद्यालयात गुणवंताचा सत्कार

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून राजीव गांधी विद्यालयात गुणवंताचा सत्कार

नायगाव / भगवान शेवाळे :


नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात आज गुरुवारी ( दि.17 ) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच औचित्य साधून गुणवंताचा सत्कार करण्यात आला.


संस्थेचे अध्यक्ष मनोज रावसाहेब मोरे पाटील यांच्या वतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 च्या परीक्षेत शाळेतून प्रथम,द्वितीय ,तृतीय, चतुर्थ व पंचम असे गुणानुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांना अनुक्रमे सात,सहा,पाच,चार,तीन हजार असे रोख बक्षीस,ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती तसेच शाल श्रीफळ पुष्पहार देऊन गावकऱ्यांच्या साक्षीने व आई-वडिलांच्या समवेत गौरव करण्यात आला.

विद्यालयातील दहावी परीक्षेतील कु.समीक्षा दिलीप मोरे( प्रथम )कु.संतोषी राजेश ढगे (द्वितीय )गणेश शेषराव ढगे (तृतीय )भागवत व्यंकटी कवळे (चतुर्थ )कु.विजया गणेश ढगे (पंचम) कु.वेदिका ईश्वर पांचाळ (शिष्यवृत्तीधारक )

या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनीचा व त्यांच्या पालकांचा मनोज पाटील मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण व चिकाटीने अभ्यास करून घवघवीत यश संपादन करावे. दरवर्षी संस्था आपल्या गुणवंताचा सत्कार करण्यास कटिबद्ध आहे.आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप नेहमीच असेल यात शंका बाळगण्याचे कारण नसल्याची भावना आपल्या भाषणात मनोज पाटील यांनी व्यक्त केली. माजी सरपंच नागोराव पाटील ढगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष निकलपुरे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उत्तमराव पा. ढगे, हनमंत पा. ढगे, बाबाराव पा. ढगे, माणिका पा.ढगे, जि. प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पानपट्टे सर,केंद्रप्रमुख पंडितराव ढगे,नागोराव पा.ढगे,आनंदराव पाटील ढगे,कोंडीबा भदरगे , आबाजी पाटील ढगे,संजय पाटील ढगे,संतोष ढगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT