नायगाव सिटी न्यूज
search

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळावर तातडीने ठोस निर्णय घ्या - खा.रवींद्र चव्हाण

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळावर तातडीने ठोस निर्णय घ्या - खा.रवींद्र चव्हाण

नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे


मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळ निवारणासह विकासाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावेत,अशी मागणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात त्यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या परंपरेनुसार दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार चव्हाण यांनी सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे पत्रात नमूद केले आहे.शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर या परिस्थितीचा मोठा परिणाम होत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे,असे त्यांनी म्हटले आहे.


शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, पिकांच्या नुकसानीची भरपाई


१७ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पिकांच्या नुकसानीची भरपाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा-पाणी तसेच रोजगाराच्या उपाययोजनांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे.त्याचबरोबर मराठवाड्याच्या विकासातील अनुशेष दूर करण्यासाठी सिंचन, पाणी, उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांसाठी कालबद्ध कृती आराखडा मंजूर करावा,अशीही मागणी त्यांनी केली आहे.


मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करण्याची मागणी


मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे तातडीने पुनर्गठन करून सक्षम अध्यक्षाची नियुक्ती करावी, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता मराठवाड्याच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याचा दिवस ठरावा,”अशी अपेक्षा खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वरील प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT