नायगाव सिटी न्यूज
search

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध नागरीकांनी आपली नावे पडताळून घ्यावे - बालाजी बच्चेवार

नायगाव / प्रतिनिधी : भगवान शेवाळे


नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नागरिकांना पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मतदार संघातील नागरीकांनी आपल्या नावांची खात्री करुन घ्यावी असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सदर मतदार यादीत आपली नावे समाविष्ट आहेत किंवा नाही यांची शहानिशा करावी, नाव समाविष्ट नसल्यास नाव नोंदविण्यासाठी, एखाद्या नावाच्या समावेशास आक्षेप असल्यास किंवा मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करावी. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ द्वारे दावा दाखल करू शकतात. नाव वगळणे किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ वापरता येणार आहे. दावे व हरकती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. संबंधित तालुक्यात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडे संबंधित यादी भागानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी आणि मतदार यादीत काही त्रुटी आढळल्यास अथवा नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करावेत असे आवाहन बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.



Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT